Mulund | म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास रखडल्यानं मुलुंडमध्ये आंदोलन | ABP Majha

Continues below advertisement
मुलुंडच्या न्यू पीएमजीपी कॉलनीतल्या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी तिथल्या रहिवाशांनी नवघर पोलीस ठाणे आणि विकासकाच्या कार्यालयावर आज मूक मोर्चा काढला.
या म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास २००७ सालापासून रखडलेला आहे. या वसाहतीतल्या एका इमारतीत नुकत्याच झालेल्या लिफ्ट दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर तीनजण लिफ्टमध्ये अडकून पडले होते. या वसाहतीत १३९९ कुटुंब राहात असून, तिचा पुनर्विकास अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. त्यापैकी ६०६ कुटुंबाना अजूनही घरं मिळालेली नाहीत. त्यांचे ट्रन्झिट कॅम्पही धोकादायक स्थितीत आहेत. विकासकानं बांधलेल्या इमारतींचं कामही निकृष्ट दर्जाचं असल्यानं तिथे अपघात घडत असल्याचा आरोप रहिवाश्यांनी केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram