Orphans Help : घोणे दाम्पत्याच्या चिमुकल्या मुलींचं खासदार सुप्रिया सुळे पालकत्व स्वीकारणार
मुंबई/पुणे : कोरोनामुळे घाला घातलेल्या जेजुरीमधल्या घोणे दाम्पत्याच्या दोन्ही मुलींचं पालकत्व आणि जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारलं आहे. एबीपी माझावर आज सकाळी सातच्या बातमीपत्रात घोणे कुटुंबावरील आघाताची बातमी प्रसारित झाली होती. त्यानंतर लागलीच खासदार सुप्रिया सुळे यांनी या बातमीची दखल घेत आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या चिमुकल्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनामुळे पालक गमावलेल्यांसाठी एबीपी माझाने विशेष मोहीम सुरु केली आहे, ज्याला सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे.