Majha Impact | 'वालधुनी'च्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा, खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी
Continues below advertisement
अंबरनाथच्या वालधुनी नदीच्या प्रदूषणाची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी दखल घेतली आहे.
प्रदूषणाच्या विळख्यातून नदीला सोडवण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करा, अशी मागणी शिंदेंनी राज्य सरकारकडे केली आहे.
अंबरनाथ एमआयडीसीतून उगम पावणारी वालधुनी नदी उल्हासनगर आणि कल्याण शहरातून वाहत जाते, मात्र MIDCमधील कंपन्या नदीत सर्रासपणे रासायनिक पाणी सोडतात. या केमिकलमुळे नदीवर भगव्या रंगाचा थरही आला होता. ही बातमी एबीपी माझानं निदर्शनास आणल्यावर आता खासदारांनीही दखल घेतली आहे.