Sanjay Raut |वर्षभरात जे जे साचलं होतं त्याचा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे समाचार घेतील : संजय राऊत
दसऱ्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी केली आहे. पण टार्गेट करणारं राजकारण शिवसेना कधीच करत नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोरोनाबाधित झाले आहेत. फडणवीसांना वारंवार सांगत होतो काळजी घ्या. कोरोना कोणालाही सोडत नाही. लसीचं राजकारण करण्याइतक्या कोत्या मनोवृत्तीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीत, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मागच्या दसऱ्या मेळाव्याला बोललो होतो की मुख्यमंत्री शिवसेनाचाच होणार. भाजपसोबत युती झाली असती तरी शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला असता. वर्षभरात जे जे साचलं होतं ते ते आज पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे एक एकाचा समाचार घेतील, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.