Metro & Mono Railway | आजपासून मोनो, उद्यापासून मेट्रो धावणार, सामान्यांना लोकल प्रवासाच्या परवानगीची प्रतीक्षा

मुंबई : लॉकडाऊननंतर आजपासून मोनोचा सर्वसामान्यांसाठी प्रवास खुला झालाय तर मुंबई मेट्रोचा प्रवास उद्या 19 ऑक्टोबर पासून सुरु होईल. मात्र अद्याप सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे. दरम्यान, मुंबईकरांची प्रतिक्षा काही अंशी तरी लवकरच संपणार आहे. लोकल प्रवासाची लिटमस टेस्ट असणारी मेट्रो 19  तारखेपासून तर मोनो आजपासूनच सर्वसामान्यांसाठी रुळावर आलीय. मात्र, त्याकरता मोनो आणि मेट्रो प्रशासनानं कडक नियमावलीही जारी केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनंतरचा सार्वजनिक वाहतूकीचा प्रवास आता पूर्वीसारखा नसेल हे नक्की.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola