Monika More hand transplant | मोनिका मोरेच्या नव्या हातात ताकद परतली

Continues below advertisement

मुंबई : "काही महिन्यात हातांची नियमित हालचाल होण्यास सुरुवात होईल, तेव्हा प्रथम त्या हाताने मी माझ्या बाबांच्या फोटोला नमस्कार करेन. माझं पूर्ण नाव लिहून काढेन." हे शब्द आहेत काही महिन्यापूर्वी दोन्ही हाताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या मोनिका मोरेचे. मोनिका महाराष्ट्रातील अशी शस्त्रकिया झालेली पहिली मुलगी असून अवघ्या 7 महिन्यात ती शस्त्रक्रिया आणि त्यानंतरच्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. त्यामुळे तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर आनंद व्यक्त करत आहे. रेल्वे अपघातानंतर दोन्ही  हात गमविलेल्या मोनिकाचा या शस्त्रक्रियेनंतर आत्मविश्वास वाढला आहे. ती आता पूर्वीसारख्या सगळ्या गोष्टीचा निर्धार करत लवकरच तिला तिच्या घरातील सदस्यांसाठी नोकरी करायची आहे, अशी इच्छा व्यक्त करत आहे. त्याचप्रमाणे ती असंही म्हणते, पुढच्या सहा महिन्यात माझ्या हाताच्या हालचालीत नक्कीच मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झालेले असतील. सध्या मी छोट्या गोष्टी उचलण्यात यशस्वी होत आहे, मात्र अजून बराच सराव बाकी आहे आणि तो मी डॉक्टरांच्या सहकार्याने पूर्ण करेन असा विश्वासही तिने एबीपी माझा डिजिटलशी बोलताना व्यक्त केला.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram