Mohit Kamboj on Anil Deshmukh : दाऊदचा साथीदार चिंकू पठाणची अनिल देशमुख यांच्यासोबत गुप्त बैठक

Mumbai Drugs case updates : आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला आहे.  किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. यावरुन आता मोहित कंबोज यांनी मलिकांना उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध आहेत हे नवाब मलिकांनी मान्य केलं आहे. माझी नवाब मलिकांना विनंती आहे की राष्ट्रवादीच्या मोठ्या मंत्र्यांच्या मुला-मुलींशी ड्रग्ज पेडलरशी कसे संबंध होते हे सांगा असा सवाल कंबोज यांनी केला आहे. 

मोहित कंबोज म्हणाले की, मला नवाब मलिक मास्टरमाईंड म्हणतात,एक महिना काय झोपले होते का?आजच कसं सुचलं. नवाब मलिक यांना खोटं बोलायची सवय आहे.  सुनील पाटीलशी संबंध आहे हे देखील मलिकांनी मान्य केलं आहे.  चिंकु पठाण या ड्रग्ज माफियाचे समीर खानशी कोणते संबंध? चिंकू पठाणची अनिल देशमुख यांच्यासोबत गुप्त बैठक झाली होती. नवाब मलिकांना मला सांगायचंय की मी तुम्हांला घाबरत नाही, माझ्यावर केस टाकल्या,चौकश्या झाल्या तरी मी घाबरत नाही. सुनील पाटील आणि नवाब मलिकांची मैत्री आजची नाही 20 वर्षांपासून आहे, असंही मोहित कंबोज म्हणाले. 

माझ्या पत्रकार परिषदा आणि माझी लढाई भाजपकडून नाही माझ्या वैयक्तिक स्तरावरुन आहेत. 350 कोटीची संपत्ती मी स्वत: डिक्लेअर केली आहे. 1100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करतअसतील तर पुरावे घेऊन या. नवाब मलिकांच्या परिवारालाच आता त्यांच्या संपत्तीवरुन उत्तरे द्यावी लागतील, असं कंबोज म्हणाले.  मी ललित हॉटेल ला गेलो होतो का याबाबत सीसीटीव्ही चेक करा. नवाब मलिकांनी सलिम-जावेदची खोटी फिल्म सुरु केलीय, असंही कंबोज म्हणाले.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola