MNS Toll Andolan | टोलमुक्तीसाठी मनसे कार्यकर्त्याचं ठाण्यात आंदोलन | ABP Majha
मुलुंड-ठाणे हद्दीवरील आनंदनगर टोलनाक्यावर मनसेचं आंदोलन सुरु आहे. शांततेच्या मार्गानं धरणे आंदोलन करुन मनसेनं टोलला विरोध केलाय. मुंबईत येण्यासाठी आणि पुन्हा ठाण्यात जाण्यासाठी दररोज ठाणेकरांना टोल भरावा लागतो. त्यामुळे ठाणेकरांसाठी टोलमुक्ती व्हावी, अशी मागणी मनसेनं केलीए.