MNS Sandip Deshpande : मालाड आणि रिचर्डसन क्रुडास कंपनीत भ्रष्टाचार : संदीप देशपांडे
Continues below advertisement
पेनड्राईव्हच्या माध्यमातून एक गौप्यस्फोट करणार असल्याचं जाहीर केलेल्या मनसेच्या संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेत युवासेनेच्या वैभव थोरात यांच्यावर आरोप केले आहेत. मालाड आणि रिचर्डसन क्रुडास कंपनीत हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय. वैभव थोरात यांनी पुरवठ्यापेक्षा जास्त सामग्रीची बिलं दिल्याचा आरोप देशपांडेंचा आहे तसंच यात युवासेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा हात होता असाही त्यांचा आरोप आहे. याबाबत गुन्हे शाखा,लाच लुचपत विभाग,ED कडे तक्रार करणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
Continues below advertisement