भिवंडीतील अनधिकृत बांधकामावरील हातोडा तात्पुरता थांबवला, 170 कुटुंबांच्या मदतीसाठी मनसेची धाव

भिवंडी तालुक्यातील कशेळी येथील पद्मावती इस्टेट या रहिवासी संकुलनात असलेल्या नऊ अनधिकृत इमारतींवर एमएमआरडीए प्रशासनाकडून  उच्च न्यायालयाच्या आदेशाने तोडू कारवाई करण्यात येत आहे. कशेळी येथील पद्मावती इस्टेट संकुलात  तब्बल 170 कुटुंब राहत आहेत आणि एमएमआरडीएचा या कारवाईने 170 कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे, मात्र आज एमएमआरडीए या  इमारतीवर कारवाई करता पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले असता पद्मावती इस्टेट मधील 170 कुटुंबांच्या मदतीसाठी मनसेचे सैनिक धावून आले.  मनसे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष मनोज गुळवी व त्यांचे कार्यकर्ते  घटनास्थळी दाखल होत इमारती वर होणाऱ्या  तोडत कारवाईला कडाडून विरोध केला  व अखेरीस आज  ही तोडक कारवाई तात्पुरता थांबवण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola