Raj Thackeray on BMC Election : पालिका निवडणुका 2025 ला होतील, राज ठाकरेंचं खोचक वक्तव्य
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राज ठाकरे यांच्या मनसेकडूनही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करण्यात येत आहे. मुंबईतल्या वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये आज मनसेची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी राज ठाकरेंनी २२ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. या बैठकीला बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, संदीप देशपांडे यांच्यासह इतर मनसे नेते उपस्थित होते.