MNS Raj Thackeray: दुकानांवरील पाट्यांचं श्रेय फक्त मनसेचं! राज ठाकरेंची भूमीका ABP Majha
दुकानांवरील मराठी पाट्या लावताना शोधल्या जाणाऱ्या पळवाटा लक्षात घेता राज्य सरकारनं नियमात दुरुस्ती केली. परंतु, याचं संपूर्ण श्रेय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंचं असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात दुकानांवरील मराठी पाट्यांचं श्रेय फक्त मनसेचं! असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात मराठी पाट्यांसाठी मनसेनं आंदोलन केलं. मनसैनिकांनी अनेक केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षाही भोगल्या. त्यामुळे हे श्रेय इतर कुणीही लाटू नये. ते फक्त मनसैनिकांचं आहे, असं पत्रक राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलं आहे.
Tags :
Raj Thackeray State Government Shop Maharashtra Navnirman Sena Credit MNS President Marathi Boards