MNS | CAA च्या समर्थनात मोर्चासाठी मनसेकडून जय्यत तयारी | ABP Majha
उद्या निघणाऱ्या मोर्चाच्या तयारीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी कंबर कसलीय. मात्र, या तयारीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीला बजावल्या आहेत. मोर्चासाठी मुंबईतल्या चौकाचौकांमध्ये छोटेखानी सभा घेण्यात येताहेत. या चौकसभांमध्ये कोणतेही गैरकृत्य किंवा शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मनसेच्या आयोजक पदाधिका-यांना जबाबदार धरलं जाणारय. दरम्यान, मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जिमखाना येथे अमित ठाकरे यांनी तयारीचा आढावा घेतला.