MNS Lok Sabha : मनसे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता; मनसेला दक्षिण मुंबईतून लोकसभेची जागा मिळणार?
Continues below advertisement
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या बदल्यात मनसेला मुंबईतल्या दक्षिण मुंबई मतदारसंघासह आणखी एखादी जागा सोडली जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मुंबईतल्या विविध मतदारसंघाचे सुरु केलेले दौरे अचानक थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आणखी बळावली आहे. तसं झालं तर मनसे नेते बाळा नांदगावकर हे दक्षिण मुंबईतून महायुतीचे उमेदवार असण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची आज भेट घेतली. अमेय खोपकर यांच्या कॅफेमध्ये त्या तिघांची भेट झाली.
Continues below advertisement