MNS : राज ठाकरेंचा मावळा उद्धव ठाकरेंच्या दरबारात; आता Amit Thackeray यांच्याकडे 'मनविसे'ची धुरा?

मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता मनविसेची धुरा राज ठाकरेेंचे पुत्र अमित ठाकरेंकडे दिली जाईल अशी चर्चा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या स्थापनेपासून आदित्य शिरोडकर यांच्याकडेच अध्यक्षपदाची जबाबदारी होती. आता हे पद रिक्त झाल्यानं अमित ठाकरे यांना अध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून अमित ठाकरे थोड्याच वेळात नाशिकमध्ये पोहोचणार आहेत. अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर मनसेचं नेतेपद त्यांच्याकडे आलं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आणि अन्य प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला होता. आता अमित ठाकरेंकडे मनविसेची जबाबदारी आली तर त्यांना संघटनेची नव्यानं बांधणी करावी लागेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola