मनसेकडून व्हिडीओद्वारे मुंबईतील नालेसफाईची पोलखोल, नालेसफाईत गाळाऐवजी उचललं जातंय चक्क डेब्रिज

Continues below advertisement

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन साकीनाका, दूधवाला बिल्डींग येथे नालेसफाईचा केवळ दिखावा कसा केला जातोय हे व्हिडीओद्वारे समोर आणले आहे. साकीनाका येथील नालेसफाईचा व्हिडिओ दाखवत नाल्यातील गाळ नाही तर डेब्रिजची वाहतूक कंत्राटदारांनी केली असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. मुंबईत नालेसफाईत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram