MNS March | मनसे महामोर्चा : आझाद मैदानात मनसेकडून जय्यत तयारी | ABP Majha
मनसेच्या महामोर्चाची वेळ आता अगदीच जवळ आली आहे. थोड्याच वेळात मुंबईतील हिंदू जिमखान्याहून मनसेच्या महामोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब सहभागी होणार आहेत. तरी, अमित ठाकरेही मनसेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच मोर्चात सहभागी होणार आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूरमधून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानावरही कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. आझाद मैदानात मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Tags :
Mns Activist Prayers Shiv Sainik MNS MahaMorcha Azad Maidan MNS Rally MNS Morcha मराठी बातम्या Pandharpur MNS March Shiv Sena