MNS 14th Foundation Day | साहेब लवकरच 'अयोध्ये'कडे कूच करावी लागणार : बाळा नांदगावकर
Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. पक्षाचे नेते अनिल शिदोरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. या कॅबिनेटला 'प्रतिरुप मंत्रिमंडळ' असं नाव देत असल्याचं अनिल शिदोरे म्हणाले. विशेष म्हणजे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी अमित ठाकरेकडे देण्यात आली आहे. तर गृह खात्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची नजर असेल. नवी मुंबईतील वाशी इथल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला.
Continues below advertisement
Tags :
MNS 14th Foundation Day Bala Nandgaonkar Speech 14th Foundation Anniversary MNS Shadow Cabinet MNS Navi Mumbai