MM Mithaiwal | मुंबईतील एमएम मिठाईवाला यांच्या चालकाला 12 लाखांच्या चोरीप्रकरणी अटक | ABP Majha
मुंबईतील प्रसिद्ध एमएम मिठाईवाला यांच्या चालकाला कांदिवली पोलिसांनी 12 लाख रुपयांच्या चोरीच्या आरोपात अटक केली आहे. प्रदीप संनगले (वय 30 वर्ष) असं आरोपी चालकाचं नाव आहे. तो दहा वर्षांपासून एमएम मिठाईवाला यांचा चालक म्हणून काम करतो. पोलिसांच्या माहितीनुसार, एमएम मिठाईवाल्याचं दररोजची कमाई दुकानाच कॅशिअर आणि चालकाच्या हाती मालकाकडे पोहोचत असे.