आमदार राजू पाटील स्वखर्चाने स्ट्रक्चरल ऑडिट करणार, कल्याण-शीळ रस्त्याचं काम दोन वर्षावरून सुरू
कल्याण डोंबिवली शहरासाठी महत्वाचा असलेल्या कल्याण शिळ या 21 किमी लांबीच्या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे .अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत हे काम कासावगतीने पुढे सरकत आहे. कासवगतीने सुरू असलेल्या या कामामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. रस्ते विकास महामंडळाकडून वेगाने काम पूर्ण करण्याचा दावा केला जात असला तरी या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
Tags :
Vaccination MNS Kalyan Raju Patil Mla Raju Patil Shilphata Kalyan Road Issue Kalyan Road Work