MLA Prasad Lad : आमदार प्रसाद लाड यांच्या घरासमोर संशयित बॅग आढळली

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुंबईतील घरासमोर एक संशयित बॅग आढळल्यानं खळबळ उडाली. आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास माटुंग्यातील लाड यांच्या निवासस्थानासमोर संशयित बॅग दिसली. लाड यांच्या घराबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी या घटनेची माहिती लाड यांना दिली. त्यानंतर लाड यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन बॅग तपासली असता त्यात जुन्या चलनाच्या नोटा, शिक्के आणि इतर वस्तू आढळल्या. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola