MLA Geeta Jain slapped engineer : मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांची अभियंत्याला मारहाण

MLA Geeta Jain slapped engineer: सध्या वाढत्या अनधिकृत बांधकामाला (unauthorized construction) जरब बसवण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. पण मीरा भाईंदरमध्ये याचसंदर्भातलं एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करायला गेलेल्या अभियंत्यांना दम दाटी केल्याचं दृश्य यावेळी कॅमेरामध्ये कैद झालं. मंगळवारी (20 जून) रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास प्रभाग क्रमांक 6 येथे काशिमीरातील पेणकर पाडा येथे पालिकेतर्फे अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली. 

यावेळी पालिकेने हे बांधकाम का तोडलं असा सवाल त्यांनी केला. कारण हे बांधकाम म्हणजे एका महिलेचं घर होतं. तसेच पावसाळ्यात आता तिला आणि तिच्या लहानग्यामुलाला भर रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तिचं घर का तोडलं असा सवाल गीता जैन यांनी यावेळी बांधकामावर कारवाई करण्यासाठी आलेल्या अभियंत्यांना विचारला. या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच या अभियंत्याने अगदी उशिरापर्यंत गीता जैन यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची तक्रार केली नसल्याची माहिती समोर येत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola