MLA Canteen | आकाशवाणी MLA निवास कँटीनचा परवाना रद्द, Sanjay Gaikwad गुन्हा का नाही?
आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनाने रद्द केला आहे. निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता केटरिंगवर ही कारवाई करण्यात आली. अन्न औषध प्रशासनाच्या तपासणीनंतर कँटीन रात्रीच बंद करण्यात आले होते. आज सकाळी आमदार निवासात राहणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने नाश्त्यासाठी येणाऱ्यांना कँटीन बंद असल्याचे दिसले. कँटीनला कुलूप लावण्यात आले असून, नवीन कॉन्ट्रॅक्टर मिळेपर्यंत ते बंद राहणार आहे. गेल्या तीस वर्षांपासून एकाच कँटीन चालकाकडे हे कंत्राट होते, त्यामुळे यावर टीकाही होत होती. या घटनेतील महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या आमदार संजय गायकवाड यांनी कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. आज विधानसभेत आणि विधान परिषदेत यावरून मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. काल विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. त्यामुळे आज संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.