Mira Road Bhayandar च्या नशिबी पाणीटंचाई कायमची, पाण्याशिवाय आम्ही जगायचं कसं? नागरिकांचा सवाल

Continues below advertisement

पाणी म्हणजे जीवन. तुम्हाआम्हा प्रत्येकालाच जगण्यासाठी पिण्याच्या पाण्याची गरज असते. इतकंच काय पण स्वच्छतेसाठी, आंघोळीसाठी, कपडे-भांडी धुण्यासाठीही पाणीच लागतं. तुमच्या आमच्या पोटात जाणारं अन्नधान्य हे पावसाच्या पाण्यावरच तर पिकलेलं असतं. मग आता तुम्हीच विचार करा एखाद्या शहरात वर्षानुवर्षे पाणीटंचाई हीच समस्या बनून राहिली असेल, तर त्या शहरातल्या नागरिकांनी जगायचं कसं? हाच प्रश्न विचारतायत मिरा भाईंदरचे नागरिक. या शहराचा पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळं संपूर्ण शहरात सध्या पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली होती. एरवीही मिरा-भाईंदर म्हटलं की इथल्या पाणीटंचाईमुळं नागरिक हैराण आहेत. मिरा भाईंदरचं पाणीसंकट कायमचं कधी दूर होईल असा सवाल या शहरातील नागरिक करत आहेत. पाहूयात एबीपी माझाचा रिपोर्ट. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram