Milind Deora Mumbai : मुंबईतील नवी वॉर्ड रचना रद्द करावी, मिलिंद देवरांची फडणवीसांकडे मागणी
Continues below advertisement
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. मुंबई महापालिकेची प्रभाग पुनर्रचना रद्द करण्याची मागणी यावेळी देवरा यांनी फडणवीस यांच्याकडे केली.. २२७ प्रभागांमध्येच निवडणुका व्हाव्यात अशी मागणीही देवरांनी केलीय. प्रभाग पुनर्रचना कुठल्याही एका पक्षाच्या फायद्याची ठरु नये असंही देवरा यांनी म्हटलंय... यावेळी देवरा यांच्यासह अमिन पटेल, रवी राजा आणि झिशान सिद्दीकी उपस्थित होते.
Continues below advertisement