Lockdown 4.0 | वसईत शकडो परप्रांतीय मजुरांचे हाल; अन्न पाण्याविना फुटपाथवर रात्र काढण्याची वेळ
Continues below advertisement
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांचे वसईत हाल होतायत. मूळ गावी जाण्यासाठी शेकडो मजुर कुटुंबीयांसह वसईच्या सनसिटी मैदानाजवळ जमलेत. ट्रेन मिळेल या आशेने हे मजुर इथल्या फुटपाथवर ठाण मांडून बसलेत. अन्न पाण्याविना रात्र काढण्याची वेळ या मजुरांच्या कुटुंबीयांवर ओढवलीय. वसई रोड रेल्वे स्थानकातून आत्तापर्यंत १७ ट्रेन विविध राज्यात सोडण्यात आल्या आहेत. सर्वाधिक ट्रेन उत्तर प्रदेशमधील जोनपूर, गोरखपूर, वाराणसीसह अन्य जिल्ह्यात सोडण्यात आल्या आहेत. पण आता फुटपाथवर झोपणाऱ्या या नागरिकांना कधी ट्रेन मिळणार असा प्रश्न कायम आहे.
Continues below advertisement