Mumbai Metro Charkop | मुंबई मेट्रो 7 चं काम वेगाने सुरू, चारकोपमध्ये मेट्रो चाचणी सुरू
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोनंतर आता आणखी दोन मार्गावर लवकरच मेट्रो सुरू होणार आहे. मुंबईमध्ये मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चं काम वेगानं सुरू असून, या मार्गावरील चारकोप आगारात मेट्रो ट्रेनची प्राथमिक चाचणी घेण्यात आलेय. सुरुवातीची चाचणी केवळ 520 मीटरसाठी होती. यानंतर मेट्रोच्या प्रत्येक उपप्रणालीची आगारात एकत्रित ट्रेन चाचणीद्वारे स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात येईल. याकरिता एक महिना लागेल, त्यानंतर मेट्रोच्या फील्ड चाचण्या सुरू होतील. मेट्रोच्या पहिल्या डब्याचं 28 जानेवारीला चारकोप आगारात आगमन झालं होतं, आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं अनावरणही झालं होतं. मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत या मार्गावरील मेट्रोचे डबे तयार केले जात आहेत.