Tauktae चक्रीवादळाचा पुढचा प्रवास कसा असेल?; हवामानशास्त्राचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे 'माझा'वर

Continues below advertisement

Cyclone Tauktae : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर तोक्ते चक्रीवादळात झालं असून अतिशय रौद्र रुप धारण करत हे वादळ आता मुंबईनजीक येऊन पेहोचलं आहे. रविवारपर्यंत गोवा, रत्नागिरी आणि उर्वरित कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ घातलेलं हे वादळ आता काहीसं पुढे सरकलं असून, सध्याच्या घडीला त्याचं केंद्र हे मुंबईच्या समुद्रसपाटीपासून 150 किमी समुद्री भागात असल्याचं सांगण्यात येत आहे. 

मुंबईला हे वादळ थेट धडकणार नसलं तरीही त्याचे थेट परिणाम मात्र शहरात दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोसाट्याचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे, तर काही भागांत मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावसालाही सुरुवात झाली आहे. पुढील चार - पाच तास मुंबईत अशीच परिस्थिती कायम राहणार असून, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तोक्ते चक्रीवादळ मुंबईपासून पुढे उत्तरेकडे सरकणार आहे. पुढे गुजरात दिशेनं या वादळाचे परिणाम दिसण्यास सुरुवात होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram