Amitabh Bachchan New Home: महानायक अमिताभ बच्चन यांचा नवा आशियाना, अंधेरीत 12 हजार चौरस फुटांचे घर
abp majha web team
Updated at:
21 Sep 2022 11:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अंधेरीत 12 हजार चौरस फुटांचे अलिशान घर खरेदी केले आहे. त्यांनी अंधेरीच्या चार बंगला या पॉश विभागातील एका इमारतीचा संपूर्ण मजला खरेदी केला आहे. पार्थेनन सोसायटीच्या 31व्या मजल्यावर हे 12 हजार चौरस फुटांचे अलिशान घर आहे. त्यांनी ही जागा राहण्यासाठी नाही, तर केवळ गुंतवणूक म्हणून खरेदी केली आहे. मात्र या डीलसाठी त्यांनी किती पैसे मोजले हे कळू शकले नाही. बिग बी यांच्या मुंबईत सध्या 6 अलिशान प्रॉपर्टी आहेत. सध्या ते जलसा या बंगल्यात आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत.