Mega Block : मुंबईत तिन्ही मार्गांवर Mega Block, मात्र पर्यायी मार्गाने लोकल फेऱ्या सुरु

रविवारच्या सुट्टीनिमित्त तुम्ही काही प्लॅन आखले असतील तर तुमचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक असणारेय. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल. तिकडे ट्रान्स हार्बर मार्गावर चुनाभट्टी ते वांद्रे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी दरम्यान देखील मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत पर्यायी मार्गाने लोकल फेऱ्या सुरु राहतील अशी माहिती रेल्वेने दिलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola