Medicine Price Hike : आता रुग्णांनाही महागाईची झळ, औषधं महागली! ABP Majha
एकीकडे सामान्य जनता महागाईमुळे होरपळत असताना आता औषधोपचारही महागले आहेत. इंधन दरवाढीनं सगळ्याच वस्तू महाग झाल्या आणि त्याला औषधंही अपवाद नाहीत. ह्रदयरोग आणि मधुमेहावरील औषधांच्या किंमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झालीय. यासोबतच प्रतिजैविक औषधं तसंच टॉनिक आणि खोकल्याच्या औषधांच्या किंमतीतही मोठी वाढ झाल्यानं रुग्णांना त्याचा फटका बसतोय.