वैद्यकीय प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, पहिली सर्वसाधारण गुणवत्ता यादी 13 नोव्हेंबरला
Continues below advertisement
मुंबई : राज्यातील वैद्यकीय प्रवेशाची प्रक्रिया मराठा आरक्षणाविना सुरू झाली आहे. मात्र ऑल इंडिया कोट्यातील पहिली फेरी झाल्यानंतर राज्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होत असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. मेडिकल (एमबीबीएस) आणि दंतवैद्यकीय (बीडीएस) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रक्रियेत राज्याची सर्वसाधारण पहिली गुणवत्ता यादी 13 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. तर मेडिकल प्रवेशाची सेंट्रलाइज ऑल इंडिया कोट्यातील पहिली फेरी ही 6 नोव्हेंबरला सुरू होऊन 12 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे.
Continues below advertisement