ग्राहकांना रांगेत उभं ठेवून मेडिकल केलं बंद, महापौर येत असल्याचा सुगावा लागल्याने दुकानदार पळून गेले
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
11 Apr 2021 06:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंधही लादण्यात आले आहेत. अशातच राज्यात वीकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. अशातच आता राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून अनेक जिल्ह्यांमध्ये बेड उपलब्ध नाहीत. बेडसाठी रुग्णांना वणवण करावी लागत आहे. अशातच कोरोना रुग्णांवर उपचारासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा भासत आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचं उघड झालं होतं.