Mumbai Mayor | शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौरपदी | ABP Majha
Continues below advertisement
महापौर पदाच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकला असून महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. एकीकडे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे मुंबईला शिवसेनेचा महापौर मिळाला आहे. त्यामुळे गेल्या 25 वर्षांपासून आपलं वर्चस्व मुंबई महानगर पालिकेवर टिकवून ठेवण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे.
Continues below advertisement