Matheran Mini Train Service : माथेरान मिनी ट्रेन सर्व्हिस 22 तारखेपासून पुन्हा सुरू
माथेरान मिनी ट्रेन सर्व्हिस 22 तारखेपासून पुन्हा सुरू होणार आहे. ऑगस्ट 2019 पासून ही मिनी ट्रेन बंद करण्यात आली होती. प्रचंड पावसामुळे घाटातील ट्रॅक पूर्णतः वाहून गेला होता. त्यामुळे संपूर्ण ट्रक पुन्हा नव्याने बांधावा लागला. नेरळ ते माथेरान 2 आणि माथेरान ते नेरळ 2 अश्या 4 फेऱ्या दिवसभरात चालणार आहेत. आज मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांनी पाहणी केल्यानंतर त्यांनी हिरवा कंदील दिलाय.