Marine Drive Crime Case: मरीन ड्राईव्हजवळ शासकीय वसतिगृहात अत्याचार आणि हत्या,मुली सुरक्षित नाही का?

Continues below advertisement

शासकीय वसतिगहातही मुली सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न आता निर्माण होतोय. मुंबईतील सावित्रीबाई फुले महिला छात्रालयात एका विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपी हा वसतिगृहाचा सुरक्षारक्षक होता, त्यानं ट्रेन खाली उडी घेऊन आत्महत्या केली. 
काल संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान मरीन ड्राइव्ह पोलिसांना या छात्रालयात चौथ्या मजल्यावर एका तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. तर याच छात्रालय मधील सुरक्षारक्षक ओमप्रकाश कनोजिया गायब असल्याचं समोर आलं. त्याचा शोध घेण्यास सुरू केल्यावर, त्यानं काही मिनिटांपूर्वी आत्महत्या केल्याचं पोलिसांना कळलं. शेजारीच असेलल्या चर्नी रोड स्थानकात ट्रेनसमोर उडी घेऊन त्यानं आत्महत्या केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram