Marine Drive Hostel Case : आरोपी यापूर्वीही वसतीगृहातील खोलीत शिरला होता : सूत्र
Continues below advertisement
मुंबईतल्या चर्नी रोड येथील शासकीय वसतिगृहात एका १८ वर्षांच्या विद्यार्थिनीची निर्घृण हत्येच्या घटनेनं काल सारा महाराष्ट्र हादरला. त्या मुलीवर हत्येआधी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचीही शक्यता आहे. पण या प्रकरणातल्या संशयित आरोपीनं चर्नी रोड रेल्वे स्थानकात आत्महत्या केल्याचं आढळून आलं. ओमप्रकाश कनोजिया नावाचा हा आरोपी वसतिगृहात वॉचमनची नोकरी करायचा. या घटनेनंतर आता महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकीय आरोपप्रत्यारोपांचं नाट्य घडताना पाहायला मिळतंय.
Continues below advertisement