Marine Drive Crime Case : मुंबईतील वसतीगृहात खून झालेल्या युवतीवर शारिरीक अत्याचार झाल्याचं स्पष्ट
मुंबईत 6 जून रोजी वसतिगृहात हत्या झालेल्या युवतीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झालंय. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात हे नमूद करण्यात आलंय. मुलीच्या नखात सापडलेले डीएनए प्रोफाईल आरोप ओम प्रकाश कनोजियाच्या डीएनशी मॅच झालेले आहेत. म्हणजेच पीडितेने प्रतिकार केल्याचं स्पष्ट होतंय. या घटनेनंतर आरोपी ओमप्रकाश कनोजिया याने लोकलखाली आत्महत्या केली. दरम्यान, एकतर्फी प्रेमातून कनोजियाने हा गुन्हा केल्याचा पोलिसांचा संशय आहे.