Marathi School : मुंबईतील मराठी शाळांची संख्या घसरतेय! पालकांचा ही इंग्रजी शाळांकडे कल

Continues below advertisement

मुंबई : एकीकडे राज्यात आणि मुंबईत मराठी भाषेचे जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असताना, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुरु असताना दुसरीकडे 'आपुल्या घरात हाल सोसते मराठी' असाच काहीसा प्रकार झाल्याचं समोर आलंय. एबीपी माझाच्या रिपोर्टमधून असं समोर आलं आहे की मुंबईतील मराठी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संख्येत मोठी घसरण होत आहे. तुलनेत पालकांचा कल हा इंग्रजी शाळांकडे असल्याचं चित्र आहे. तसेच मुंबईत हिंदी आणि उर्दू शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या ही मराठीच्या जवळपास दुप्पट असल्याचंही समोर आलं आहे. 

मुंबईत स्वत:ला मराठी भाषकांचे 'कैवारी' समजणारी शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत आहे. तसेच मनसेनेही आतापर्यंत मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. हे दोन प्रमुख पक्ष मराठीच्या मुद्द्यावर लढत असताना मराठी शाळांची स्थिती मात्र काहीशी चांगली नाही. मुंबईत सातत्याने मराठी शाळांची संख्या कमी होतेय आणि सत्ताधाऱ्यांना याचं काही सोयरंसुतक नसल्याचं दिसून  येतंय. 

मुंबईत हिंदी आणि उर्दू शाळांची संख्या वाढतेय
मराठी शाळांची परिस्थिती इतकी का खालावली? मुंबईतील हिंदी, उर्दू शाळांनी आपली पकड अजूनही घट्ट धरुन ठेवली आहे. मग मराठी पालकवर्ग मराठी शाळांपासून दूर का जातोय? मराठी शाळांकडे दुर्लक्ष का केलं जातंय असा प्रश्न पडतोय. मराठी भाषिकांची संख्या जास्त असणाऱ्या मुंबईत मराठी शाळांमध्ये पटसंख्या कमी होतेय. तर दुसरीकडे हिंदी आणि उर्दू शाळेत विद्यार्थी संख्या कमालीची वाढतेय. याचं कारण हिंदी आणि उर्दू भाषिकांनी आपल्या मातृभाषेत शिकवण्याचा केलेला आग्रह 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram