Maratha Reservation | मराठा आरक्षण मार्गी लागावं यासाठी आधीही प्रयत्नशील होतो,आजही आहोत: अशोक चव्हाण

काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे दोन्ही नेत्यांची भेट झाली. मराठा आरक्षण स्थगितीनंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी या नेत्यांमध्ये चर्चा झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही बैठकीला उपस्थित होते. मराठा आरक्षणाचा विषय  मार्गी लागावा यासाठी आधीही प्रयत्नशील होतो, आजही आहोत, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola