Maratha Reservation : विनायक मेटेंच्या निधनामुळे मराठा आरक्षणाची बैठक 25 ऑगस्टला होणार
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर २५ ऑगस्टला बैठकीचं आयोजन करण्यात आलंय... शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मराठा आरक्षणाची बैठक पुढे ढकलण्यात आली होती... १४ ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी येताना मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मेटेंचं अपघाती निधन झालं होतं... त्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक २५ ऑगस्टला सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी ७ वाजता पार पडणार आहे... ((बैठकीसाठी राज्यभरातील समन्वयक आणि नेते उपस्थित राहतील... विनायक मेटे यांच्या निधनानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा नेते आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. ))