Maratha Protest Mumbai : Manoj Jarange यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस, Azad Maidan वर हाल!
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल साचला आहे. यामुळे आंदोलनस्थळी बसणेही अशक्य झाले असून, आंदोलकांना आसरा शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. शौचालयांची अपुरी संख्या आणि त्यातही पाण्याची अनुपलब्धता यामुळे आंदोलकांचे हाल होत आहेत. सीएसएमटी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, दुतर्फा पार्क केलेल्या गाड्यांमुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली आहे. कालची रात्र आंदोलकांनी मिळेल तिथे आसरा घेतला. शेकडो आंदोलक सीएसएमटी स्थानकात आणि फोर्ट भागातील इमारतींखाली झोपले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारशी त्यांचा लढा सुरू आहे.