Maratha Kranti Morcha protest : पवारांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाचा आदोलनाचा प्रयत्न

Continues below advertisement

 मराठा आरक्षणावरून मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी बुधवारी सकाळी सिल्व्हर ओक परिसरात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पेडर रोडच्या जंक्शनवर असलेल्या स्वामी नारायण मंदिराजवळच मुंबई पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाचे योगेश केदार यांना ताब्यात घेतलं. साल 1994 साली ओबीसी आरक्षण १४ वरून ३० टक्क्यांवर नेण्याच्या अध्यादेशावरून आंदोलकांमध्ये रोष होता. याच अध्यादेशाची होळी ते सिल्ह्वर ओकबाहेर करणार होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं आंदोलकांनी तिथेच या जीआरचे कागद फाडून आपला निषेध व्यक्त केला. तसेच शरद पवारांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भावना व्यक्त केली.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram