BMC Khichadi Ghotala : मुंबई महापालिकेच्या खिचडी घोटाळ्यात अनेक बाबी उघड

Continues below advertisement

मुंबई महापालिकेतील खिचडी घोटाळ्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात अनेक बाबी उघड झाल्यात. खिचडी बनवणाऱ्या कंपनीकडे आरोग्य विभागाचा कोणताही परवाना नव्हता. तरीही त्यांना खिचडीचं कंत्राट देण्यात आलं. विशेष म्हणजे फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस ही कंपनी विटा, वाळू पुरवठा आणि सुरक्षा रक्षक पुरवत होती. तरीही या कंपनीला खिचडी बनवण्यासाठी ४ कोटी २० लाख रुपये देण्यात आले. आणि या कंपनीने खिचडीचं सब-कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या कंपनीला दिलं होतं. यात बनावट कागदपत्रे बनवली गेली. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता का?, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने सुनील बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, सुजीत पाटकर, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त, इतर अधिकारी आदींविरोधात गुन्हे दाखल केलेत. फसवणुकीची रक्कम ६ कोटी ३७ लाखांची असल्याची सांगितली जाते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram