Mansukh Hiren : मनसुख हिरण अँटीलिया स्फोटकांच्या कटात सामील, NIAची माहिती

Continues below advertisement

Sachin Waze NIA Investigation: सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांबद्दल सचिन वाझे यांची चौकशी करण्यास देखील CBI ला परवानगी देण्यात आली आहे. NIA कस्टडीतच सीबीआय परमबीर सिंह यांच्या देशमुखांवरील आरोपांची वाझेंकडे चौकशी करणार आहे. वेळ सीबीआयनं एनआयएसोबत बोलून ठरवावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.  कोर्टाचे निर्देश

 

तर या प्रकरणातील विनायक शिंदे आणि नरेश गोरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांना 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे एनआयए कोर्टाचे निर्देश दिले आहेत. 

 

महत्वाचं म्हणजे मनसुख हिरण मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या कटात सामील होता. त्यातूनच त्याचा जीव गेला असा दावा एनआयएनं कोर्टात केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram