Manoj Jarange Patil PC Day 2 : आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी थेट मोदी-शाहांना इशारा, UNCUT PC

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सध्या मुंबईच्या आझाद मैदानात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी मराठा आंदोलक (Maratha Reservation) मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी आझाद मैदानात ठिय्या मांडला आहे. मराठा आंदोलक काल रात्रभर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकातील फलाटांवर झोपले होते. मात्र,  आज सकाळी आझाद मैदानाच्या परिसरात असलेल्या अनेक शौचालयांमध्ये पाणी नव्हते. तसेच मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाल्याचे दिसून आले आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीएमसी आयुक्तांना थेट इशारा दिलाय.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला राजकारण करायचे नाही, आरक्षण पाहिजे आहे. मुख्यमंत्र्यांना राजकारणच करायचे आहे, आरक्षण द्यायचे नाही. माझे सर्वांना विनंती आहे की, तुमच्या गाड्या दिलेल्या पार्किंगमध्ये लावा. संयम बाळगा, शांत रहा, आपण वाट बघू. तुमच्या गाड्या सरकारने दिलेल्या मैदानावर लावा. आता सगळ्या मुंबईत मराठे आले आहेत. त्यांनी मुंबईत येऊ नये का? ते काही वाईट करणार नाहीत हा माझा शब्द आहे. माझं पोरांना सांगणे आहे की, अजिबात वाईट करायचे नाही. आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले आहेत. फक्त आपापले वाहने सुरक्षित लावा. बीपीटी ग्राउंडवर गाड्या लावा. शिवडी येथे देखील गाड्या लावा. वाशीचे मैदान हे 20 ते 22 किलोमीटरवर आहे. तिथे काही गाड्या लावा, असे आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola