Mankhurd Fire | मानखुर्दमधील आगीमागे माफिया अन् पालिकेची पार्टनरशिप : भाजप नेते किरीट सोमय्या

Mankhurd Fire | मानखुर्दमधील आगीमागे माफिया अन् पालिकेची पार्टनरशिप : भाजप नेते किरीट सोमय्या 

मानखुर्दमधील मंडाला भागात कुर्ला स्क्रॅब विभागाला भीषण आग लागली आहे. तब्बल पाच तासांनंतही ही आग धुमसतीच आहे. गेल्या चार तासांपासून अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, मानखुर्दमध्ये लागलेल्या या आगीमागे माफिया आणि पालिकेची पार्टनरशिप असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर मानखुर्दचे स्थानिक आमदार अबू आझमी यांनी सरकार यासंदर्भात बेजबाबदार भूमिका घेत असल्याचा आरोप केलाय.

किरीट सोमय्या यांनी बोलताना सांगितलं की, "मानखुर्दमध्ये हा जो कचऱ्याचा अड्डा आहे. तो माफियांचा अड्डा झालेला आहे. कारण चार साडेचार वर्षांपूर्वी अशीत भीषण आग लागली होती. तिथे ऑईल माफिया, कचरा माफिया हे सगळे एकत्रित येतात. पण पुढे कारवाई होत नाही. चार, सहा महिने सुधारणा होते. पण मुंबई पालिकेतच माफिया बसलेले आहेत. त्यामुळे पुन्हा हे माफिया बेफाम काम करतात. आजही जी आग लागली आहे त्यामागे माफियांचाच हात आहे. जोपर्यंत मुंबई महापालिकेचे माफिया दूर होत नाहीत, तोपर्यंत हा आगीचा शाप तसाच राहणार."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola