Manish Sisodia : कथित मद्य घोटाळ्याप्रकरणात मनीष सिसोदिया यांना अटक, काय आहे प्रकरण?
abp majha web team
Updated at:
26 Feb 2023 11:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मनीष सिसोदिया यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सीबीआयने ८ तासांच्या चौकशीनंतर सिसोदियांना अटक केली. सकाळी ११.१० वाजता सिसोदिया सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. याआधीही गेल्या रविवारी सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण चौकशीत सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत सीबीआयनं मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे.