Mahim Majar Issue : राज ठाकरेंनी आक्षेप घेतलेली माहिममधील मजार पूर्णपणे सपाट ABP Majha
Continues below advertisement
Mahim Majar : माहिम (Mahim) समुद्रातील वादग्रस्त मजारीभोवतीचं अनधिकृत बांधकाम (Unauthorized construction) हटवण्यात आलं आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई महापालिकेचं (Mumbai Palika) अतिक्रम विरोधी पथक माहीमच्या समुद्रात दाखल झालं होतं. त्यानंतर कारवाई सुरु करण्यात आली होती. अखेर माहिम दर्ग्यामागील वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण झाली आहे. दरम्यान, माहिम किनारा परिसर आणि दर्ग्याभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अखेर राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर माहिम दर्ग्याच्या मागे असणाऱ्या वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण झाली.
Continues below advertisement
Tags :
Balasaheb Thackeray Municipal Corporation Mahim Dargah MNS Raj Thackeray Mumbai Gudi Padwa Melava Shivsena MUMBAI POLICE Mahim Dargah Trust Mahim Beach