Mahesh Landge : दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्या मंत्र्याला भर चौकात फाशी द्यायला हवी : महेश लांडगे

Mahesh Landge on nawab malik :    अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना केवळ अटक करून भागणार नाही तर अशा मंत्र्याला भर चौकात फाशी द्यायला हवी. असा एकेरी उल्लेख करत भाजप आमदार महेश लांडगेनी थेट प्रकरणाचा निकालच लाऊन टाकला. नवाब मलिकांना गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली. याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये उमटले. मलिकांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी पिंपरी चिंचवड भाजपने आंदोलन केलं. यावेळी बोलताना लांडगेनी मलिकांचा एकेरी उल्लेख केला आणि बॉम्ब स्फोट घडविणाऱ्या देशद्रोही दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या या मंत्र्याला केवळ अटक करून चालणार नाही, तर भर चौकात फाशी द्यायला हवी. असा निकालच देऊन टाकला.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola